मानवनिर्मित वनव्यामुळे म्हणजेच मानवी हस्तक्षेपामुळे वनात लागलेल्या आगीचा तेथील वनस्पती व पशूंवर प्रतिकूल परिणाम होतो. वसंत ऋतुत पर्वतीय भागात फुलणार्या रमणीय ‘नीलकुरिंजी’ (Strobilanthes kunthianus) या फूल-वनस्पतीला या वनव्याचा धोका असल्याचे दिसून आले आहे. पहाडी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गवत वाढते आणि उन्हाळ्यात ते वाळते. त्यामुळे आगीच्या एका ठिणगीने संपूर्ण क्षेत्र नष्ट होण्याचा धोका असतो.
‘नीलकुरिंजी’ (जैविक नाव: स्ट्रोबिलंथस कुंथिएनस) ही वनस्पती दक्षिण भारताच्या पश्चिम घाटामध्ये 1800 मीटर उंचीवर शोला गवती मैदानामध्ये मुख्यताः आढळून येते.
या रोपाला 12 वर्षांमध्ये केवळ एकदाच बहर येतो.
निलगिरी पर्वताला याच वनस्पतीच्या नावावरून नाव मिळाले.
निलगिरी पर्वताच्या ‘कलहट्टी’ नावाच्या उतारी प्रदेशात ही वनस्पती बहरल्याचे आढळून आले आहे.
त्याच्या निळ्या रंगाच्या फुलांमुळे त्याला नील हे नाव मिळाले. हे परदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षन केंद्र आहे.