भारतातील पारंपरिक नृत्यप्रकारानंतर हळूहळू वेगवेगळे डान्सचे प्रकार भारतात येऊ लागले. हिप हाॅप, सालसा, जॅझ अशा आंतरराष्ट्रीय डान्सच्या प्रकारांनी अनेकांना वेड लावलं. नवीन काहीतरी शिकयोत यामुळे अनेकांनी या डान्स क्लासेसना प्रवेश घेतला, पण या डान्स क्लासेसचा एक विशिष्ट वर्ग म्हणजे ज्यांना डान्स येतो किंवा ज्यांना डान्सची आवड आहे. असा वर्ग डान्सचं वेड असलेले लोक वगळता याकडे फारसं कोणी वळलंच नाही. पण झुबां डान्समुळे तुमच्या आरोग्याविषयीच्या तुमच्या अनेक समस्या दूर होतील. झुबां नेमका हा प्रकार आहे. हा एक डान्स फिटनेस प्रकार आहे. 90 चर्या दशकात एका कोलंबियन नृत्यदिग्दर्शकानं हा फिटनेस प्रकार तयार केला आहे.
सध्या जगभरातील 180 देशांमध्ये या झुंबाचे क्लासेस घेतले जातात. फिटनेस म्हणजेच उत्तम आरोग्याची कल्पना हळूहळू भारतात पसरत चालली आहे. थोडक्यात डान्स करता करता वजन कमी करायचं. हा डान्स कोणत्याही वयोगटातील लोकांना शिकावा. अगदी लाहान मुलांपासून तर 60 ते 70 वर्षांचा वयोवृद्ध देखील झुंबा शिकू शकतो.