कौशल्य विकासातून राज्याच्या उद्योग क्षेत्रातील महिला उद्योजकांची टक्केवारी ५० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी “हिरकणी महारा्ष्ट्राची” ही नवी योजना जाहीर केली.
या योजनेत प्रत्येक जिल्ह्यातील बचतगटांच्या सदस्यांना, महिलांच्या कल्पनांना कौशल्य प्रशिक्षणातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल. महिला उद्योजक, बचतगटातील महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या नवीन उद्योजकीय संकल्पनाना प्रत्यक्षात आणण्याचे, बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम या योजनेत केले जाईल. ही योजनेची सुरुवात लातूर आणि चंद्रपूर या जिल्हातून होणार आहे