सांगली लोकसभा निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला असुन राज्यभर त्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सांगली येथे झालेल्या प्रचार सभेत धनगर समाजाला मीच आरक्षण मिळवून देणार आहे.
यासाठी सुरुवात आम्ही केली, त्यामुळे शेवटही आम्हीच करणार, असा विश्वास दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे. ओबीसी कमिशनला या आधी घटनात्मक दर्जा नव्हता, मात्र नरेंद्र मोदी यांनी तो दिला, असेही महादेव जानकर यांनी यावेळी प्रतिपादन केले.