बुलंदशहर | लोकसभा निवडणूक शिगेला पोहचले आहे. कालच देशभरात दुस-या टप्प्यात मतदान झाले. मात्र, उत्तर प्रदेशात एक घटना घडली आहे. हत्तीला मतदान करण्याऐवजी चूकून कमळाचे बटन दबल्याने एका तरुणाने आपली तर्जनी कापली. पवन कुमार असे ह्या तरुणाचे नाव असून तो बहुजन समाज पार्टी कट्टर समर्थक असल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळते.
दरम्यान, पवन कुमार यांची प्रकृती ठीक असून त्यांनी नैराश्यापोटी हे कृत्य केल्याचे कळते. मतदान करायचे होते बसपाला पण चूकन बटन भाजपाचे दबल्याने आत्मिक ग्लानीमुळे पवन यांनी त्याचे बोट कापल्याचे सांगितले आहे.