कॅनरा बँक ही देशातली सार्वजनिक क्षेत्रातली पहिली बँक आहे, ज्याने भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) ठरवून दिलेले EMV मानदंड पूर्ण केले. ATM जाळ्याच्या माध्यमातून सध्या केल्या जाणार्या व्यवहारांसाठी वापरल्या जाणार्या कार्डसाठी EMV चिप आणि पिन या सुरक्षा योजना योजल्या गेल्या आहेत.
ACI वर्ल्डवाइड या संस्थेनी अशी घोषणा केली की, कॅनरा बँकेनी देशभरातले त्याचे ATM जाळे आणि आधारचे प्रमाणीकरण तसेच ACIच्या UP रिटेल पेमेंट्स सोल्यूशनचा लाभ घेण्यासाठी EMV कार्डला समर्थन देणारी नवीन कार्यक्षमता यशस्वीरित्या अंमलात आणली आहे.
RBIने परंपरागत चुंबकीय पट्टी असलेल्या कार्डला बदलण्यासाठी EMV चिपचा वापर करण्यास 31 डिसेंबर 2018 ही अंतिम मुदत ठरविण्यात आली होती. गहाळ आणि चोरी झालेल्या कार्डमार्फत होणारी फसवणूक तसेच बनावट कार्डची प्रकरणे कमी करणे हा या मागचा उद्देश आहे.