मुंबई | अभाविप मुंबई महानगराच्या वतीने 15 ते 22 एप्रिल या काळात ‘Nation First, Voting Must’ हे अभियान राबविण्यात आले आहे. मतदानाबाबत जनजागृती करून नागरिकांना मतदानामध्ये आपला हक्क बजावण्यासाठी अभाविपने आपली लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठीची जबाबदारी लक्षात घेता या अभियानाचे आयोजन केले होते.
मतदानाबाबत जनजागृती करताना अभाविपने महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या नव मतदारांवर,(नवीन मतदार) विशेष लक्ष देत विविध माध्यमांद्वारे जनजागृती केली आहे. यावेळी अभाविपने जनजागृती करताना निवडणुकीमध्ये विशिष्ट मतदारसंघामध्ये उभे राहिलेल्या मतदारांमधुन एक उमेदवार विजयी होतो.
‘NOTA’ मुळे कदाचित त्यातला त्यात चांगला असणारा उमेदवार डावलला जाऊ शकतो असा दुष्परिणाम आणि त्यामुळे उपलब्ध उमेदवारांपैकी योग्य उमेदवाराच्या मतदानासाठी साद घालताना शंभर टक्के मतदान ह्यावर अभाविपच्या मतदार जनजागृती अभियानाद्वारे भर देण्यात आला. तसेच दहशतवाद, माओवाद आणि जातिवादाला खतपाणी घालणाऱ्या उमेदवाराविरोधात मतदारांनी आपले मत द्यावे, असे ही आवाहन या अभियानाद्वारे केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर मुंबईतील विविध ठिकाणांवर उपलब्ध माध्यमातून अभाविप नागरिकांना मतदानासाठी प्रेरित करणार असल्याचे”, अभाविप मुंबई महानगर मंत्री अमेय महाडिक यांनी यावेळी सांगितले. “‘Nation First, Voting Must’ अभियानात १००% मतदानाबाबत मुंबईतील सर्वच ठिकाणी ही जनजागृती करण्यात आली असून अभाविपने यावेळी प्रत्यक्ष समाजमाध्यमांच्या वापरासह ३ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन करण्याचा प्रयत्न केला आहे. अभाविपने ह्या अभियानाद्वारे, आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेता एक महत्त्वाची भुमिका यशस्वीपणे पार पाडत असल्याचे”, ही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.