सद्या देशात लोकसभा निवडणुकीचं रणसंग्राम सुरु आहे. शासनस्तरावर मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील एका कुटुंबाला रामनवमीच्या दिवशी पूत्ररत्न प्राप्त झाल्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या सर्व खेड्यात शंभर किलोच्या आसपास पेढे वाटून शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन केले. पेढ्याच्या पिशवीत १०० टक्के मतदान करा असे स्टिकर लावण्यात आले. यातूनच जवळपास एक हजार कुटुंबाला मतदानाविषयी जनजागृती केली.
दरम्यान, नवपूत्राचे मामा दिनेश चव्हाण आणि गितेश चव्हाण यांनी ठिकठिकाणी मतदानाविषयी जनजागृती केली. नोटा हा पर्याय नसून सर्वांनी आपली जबाबदारी मतदान करुन पार पाडली पाहिजे असे सामाजिक कार्यकर्ते दिनेश चव्हाण यावेळी म्हणाले.