ती मैत्री आहे म्हणून वेगळी असावी बहुतेक,
तुझ्या माझ्यातल्या अंतरामधली अदृष्य रेष असावी बहुतेक….
कालपर्यंत ओळख नसलेली, आज हवीशी वाटणारी ओढ असावी बहुतेक,
तुझ्या माझ्या मनात दडलेली एखादी जुनी इच्छा असावी बहुतेक…..
तासंतास रंगवून ठेवण्याची किमया असावी बहुतेक,
एकमेकाला ओळखण्याची गमत असावी बहुतेक……
स्पर्शाने बहरून उठणारी पावसाची सर असावी बहुतेक,
नखशिकांत भिजण्याची हीच योग्य वेळ असावी बहुतेक…..
मनातलं सारं, सारं सांगणारी कविता असावी बहुतेक,
तुझ्या माझ्यातल्या अंतरामधली हीच अदृष्य रेष असावी बहुतेक…..
– प्राची मोहिते