देशात एक दुःखद घटना परत ऐकण्यात आली. मुलुंड (नवघर) येथील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या ATM मध्ये 38 वर्षीय नराधमाने हे कुकर्म केले आहे. या कुकर्माचे व्हिडियो social media वर खूप पसरत आहे जे मुलीच्या सन्मानाच्या विरोधात आहे.
अभाविप हे महिला सुरक्षिततेच्या विषयी खुपच जागृत असून काम करणारी संघटना असून जबाबदारीपणे या प्रकारच्या घटना व या घटनेचा निषेध व्यक्त करते आणि तसेच महिला सुरक्षिततेचा विषय प्रशासनाने लवकरात लवकर गंभीऱ्याने घेतले पाहिजे. अशी मागणी अभाविप चे मुंबई महानगर मंत्री अमेय महाडिक यांनी केली. महाडिक यांनी सांगितले की, या विषयी मुंबई पोलीस अधीक्षक यांनी स्वतः लक्ष दिले पाहिजे जेणे करून महिलांवर अत्याचार व त्यांचे असन्मान करणाऱ्या नराधमांना शिक्षा लवकर होऊ शकेल.