महाराष्ट्रात प्रथमच लागू झालेल्या मराठा आरक्षण प्रवर्गात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश झाले, यामध्ये जवळपास 228 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणा वरील आव्हान मिळालेल्या याचिकेवर निर्णय देताना वरील प्रवर्गातील सर्वच 228 प्रवेश रद्द करण्याचा निर्णय दिला यामुळे विद्यार्थी वर्गामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता.
गेल्या दहा-बारा दिवसापासून या प्रकरणातील घोळ सुरू होता. अभाविप ही या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश हे ग्राह्य धरले जावेत व सरकारने त्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी सरकारकडे केली होती. सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेवून सकारात्मक भूमिका घेत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली. त्यातच आज सरकारने ते सेव प्रवेश कायम राहावेत यासाठी जारी केला, त्यामुळे वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे 228 प्रवेश जसेच्या तसे कायम राहतील.
मराठा प्रवर्गातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे 228 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होऊ नये म्हणून सरकारने काढलेल्या अध्यादेशाचे अभाविप स्वागत व अभिनंदन करते, त्यामुळे आता या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होणार नाही असे मत कोकण प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या प्रवर्गा अंतर्गत पुढे मिळू शकणाऱ्या प्रवेशाबाबतही सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.