गेल्या काही वर्षांपासून, मुंबई विद्यापीठ परीक्षा निकाल सारख्या गंभीर समस्यांमुळे चर्चेत राहिला आहे. अशाप्रकारे, भारताच्या प्रसिद्ध विद्यापीठातील प्रशासनावर विद्यार्थ्यांच्या मनात खूप शंका आहे. खरंतर, हे गोंधळ 2016 पासून सुरु झाले आहे. पुनर्नियोजन न करुन मुंबई विद्यापीठ प्रशासनाने ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासण्याचा निर्णय घेतला होता. या गोंधळात भरपूर उत्तरपत्रिका गहाळ झाल्या. अभाविपने विधानभवन समोर आणि माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलने करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा काम केला होता आणि सरकारला मागणी करून माजी कुलगुरू यांना निलंबीत करून घेतले होते.
“विद्यार्थ्यांचे निकाल वेळेवर आले पाहिजे, ज्या करिता अभाविप मुंबई विद्यापीठ प्रशासनाशी सतत संवाद करत आहे आणि निकाल वेळेवर लावण्याकरिता मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिले. परंतु या वेळी जर विद्यार्थ्यांवर अन्याय झाला तर आम्ही विद्यापीठाच्या आणि सरकारच्या विरोधात मोठा आंदोलन करू, असे अभाविपचे मुंबई महानगर मंत्री अमेय महाडिक यांनी सांगितले.