मुंबईतील २३ वर्षीय आरोही पंडित या तरुणीने एक नवा इतिहास रचला. ती लाईट स्पोर्ट एअरक्राफ्ट (LSA) याच्या सहाय्याने अटलांटिक महासागर ओलांडणारी जगातली प्रथम स्त्री बनली आहे. त्या मुंबईच्या रहिवासी आहेत. पंडितने आपल्या छोट्या विमानासोबत एकटीनेच स्कॉटलँडच्या ‘विक’ पासून उड्डाण घेतले होते. जवळपास 3000 किमीचा प्रवास करत ती कॅनडाच्या इकालुइट विमानतळावर उतरली. त्या दरम्यान आइसलँड आणि ग्रीनलँडला थांबा घेतला.
पंडितने हे उड्डाण ‘वी! वूमन एमपॉवर एक्सपीडिशन’ अंतर्गत घेतले. ‘सोशल एसेस’ या संस्थेकडून हा प्रवास आयोजित करण्यात आला होता. तिचे ‘माही’ हे छोटे विमान एक सिंगल इंजिन ‘साइनस 912’ विमान आहे. त्याचे वजन एका जवळपास 400 किलोग्रॅम आहे.