प्रथमच, आगामी ICC विश्वचषक स्पर्धेतील सर्व 10 सहभागी संघाच्या भ्रष्टाचारमुक्त टूर्नामेंट घडवून आणण्यासाठी एक एंटीकरप्शन अधिकारी नियुक्त केलेला असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अनुसार; हा निर्णय फिक्सिंग आणि भ्रष्टाचार मुक्त विश्वचषक घडवून आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
स्पर्धेत प्रत्येक संघांच्या बरोबर राहून हे अधिकारी खेळाडूंच्या जवळ जाणाऱ्या किंवा बॅक-रूमच्या कर्मचार्यांशी सलगी करणाऱ्या संभाव्य भ्रष्टाचार्यांना नजर ठेवतील आणि त्यामुळे संशयास्पद असलेल्या कोणत्याही वर्तनाला ते शोधून काढू शकतील. या महिन्यापासून ब्रिटनमध्ये विश्वचषक 2019 स्पर्धा होणार आहे.