प्रत्येक उन्हाळ्यात गुजरात वन विभागाकडून गिरच्या जंगलातल्या वन्यप्राण्यांची गणना (Herbivore Census) केली जात आहे. यावर्षीचा अभ्यास 13 मे रोजी सुरू झाला. या गणनेत हरिण, चितळ, निलगाय, सांबर, चिंकारा, चौशिंगी सांबर आणि रानडुक्कर तसेच भारतीय लंगूर व मयूर या प्राण्यांचा समावेश केला गेला आहे.
गिरचे जंगल गुजरात राज्याच्या हद्दीत आहे. ते चितळ, लंगूर तसेच आशियाई सिंह यासारख्या लुप्त होत चाललेल्या प्रजातींचे घर आहे. आशियाई सिंहासोबतच तेंदुआ, हायना आणि लांडगा यासारखे प्राणी देखील येथे आढळून येतात. यापूर्वीच्या गणनेत तेथील सर्व वन्यप्राण्यांची एकूण संख्या 1.32 लक्ष एवढी होती.