हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत पाटील आघाडीवर असून त्यांना पहिल्या फेरीनंतर एकूण112104 मते पडली आहेत. तर, दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे सुभाष वानखेडे हे असून त्यांना 55684 मते पडली आहेत. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोेड हे आहेत.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या सुरवातीपासूनच उमेदवार समर्थकांची धडधड वाढू लागली आहे. निवडणुकीत वंचितच्या मतांवरच विजयी उमेदवारांचे गणित अवलंबून दिसत आहे. शिवसेनेचे हेमंत पाटील आणि काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्यात थेट लढत येथे पाहायला मिळत आहे.
हिंगोली लोकसभा मतदार संघात हिंगोली, वसमत, कळमनुरी या विधानसभा मतदार संघासह नांदेड जिल्ह्यातील हदगाव, किनवट तर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत पाटील आघाडीवर असून त्यांना पहिल्या फेरीनंतर एकूण112104 मते पडली आहेत. तर, दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे सुभाष वानखेडे हे असून त्यांना 55684 मते पडली आहेत. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोेड हे आहेत.
मतदारसंघ हिंगोली
1) हेमंत पाटील(शिवसेना)- 112104
2) सुभाष वानखेडे(काँग्रेस)-55684
3) मोहन राठोड(वंचित बहुजन आघाडी)-32437