गेल्या आठवड्यापासून मुंबई च्या आयसीटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुख्य चर्चेचा भाग झाला आहे. तसेच या विषयाला वेगवेगळा वळण लागला आहे. या विषयाची माहिती आयसीटी च्या विद्यार्थ्यांनी व अभाविपने महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना देण्याचे ठरवले. प्रो. जी.डी. यादव यांच्या वर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी घेऊन अभाविपचे प्रतिनिधी मंडळ महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना भेटले.
विद्यार्थ्यांवर कशा प्रकारे अन्याय होत आहे याची सखोल माहिती चर्चा करताना तावडे यांना अभाविपने दिली. तसेच उद्या तावडे यांनी आयसीटी च्या संबंधीत अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलवली आहे. या विषयाची सखोल चौकशी व्हावी आणि लवकरात लवकर विद्यार्थ्यांना न्याय मिळावा असे मत अभाविपचे मुंबई महानगर मंत्री अमेय महाडिक यांनी स्पष्ट केले.