लोकसभा निवडणुकीचं निकाल भाजपाच्या पदरात पडले आहे. भाजप आणि एनडीएच्या घटक पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या लोकसभेत राज्यात भाजप- शिवसेनेला मोठं यश मिळालंय. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला किती मंत्रीपदे येणार याची राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहे. १७ व्या लोकसभेत भाजपा आणि गटक पक्षाने ३५० टप्पा गाठला आहे. यामध्ये भाजपा ३०३, तर शिवसेना १८ ठिकाणी विजयी झाली आहे.
दरम्यान, विदर्भात या लोकसभेत १० पैकी ८ खासदार युतीचे आले आहेत. यामध्ये भावना गवळी, प्रतापराव जाधव, कृपाल तुमाने या शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची नावे आहेत.विदर्भातील खासदार आणि आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यांची भेट घेतली असून विदर्भाला केंद्रात मंत्रीपद देण्याची मागणी केली आहे. यामध्ये यवतमाळ- वाशीमच्या खासदार भावना गवळी यांची ही पाचवी टर्म आहे तर प्रतापराव जाधव यांची तिसरी टर्म त्यामुळे विदर्भातील शिवसेना खासदाराला एकतरी मंत्रीपद मिळावे अशी सर्वत्र अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहणे औचित्याचं ठरेल.