सोशल आणि स्पोर्ट या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बुलढाणा जिल्ह्यातील प्रदीप दिवानसिंग जाधव यांना जाहीर झाला व पुरस्कार वितरण सोहळा 17 जून रोजी Dist Hoshangabad M P येथे होणार आहे. या पुरस्कारांमध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या छोट्या खेडेगावातल्या प्रदीप जाधव यांची निवड करण्यात आली. प्रदीप जाधव यांचे शिक्षक निळकंठ नाफडे, विनय वैराळकर तसेच नेहमी मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक निलेश शिंदे यांनी प्रदिप जाधव यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रदीप जाधव पुण्यामध्ये शिकत असताना प्रॅक्टिस करत असताना अनेक संकटांना समस्यांना सामोरे जाऊन यशस्वी होण्याचा मार्ग स्वतः शोधत आहे. प्रदीप जाधव खूप मोठा हो कीर्तिवान हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना सर्व शिक्षकांनी व प्रशिक्षकांनी दिली आहे. यावेळी प्रमोद फुलसुंदर मृत्युंजय फाईट क्लब इंडियाचे अध्यक्ष प्रदीप जाधव यांचे कोच आहे. तसेच अरविंद साळवे किंग ऑफ द रिंग अकॅडमी अध्यक्ष, संतोष देवकुळे आयडियल तायक्वांदो अकॅडमी पुणे यांचे नेहमी मार्गदर्शन लाभत आहे.