सहयोग संस्थेच्या माध्यमाने ठाण्यातील काही कार्यकर्ते मंडळी आपले येऊर मिनी माथेरान असल्याचे आव्हान नागरिकांना करत असते.निसर्ग संरक्षण, पर्यावरण क्षेत्र विकास, सामाजिक बांधिलकी ,पर्यटन क्षेत्र विकास या चार तत्त्वांवर सहयोग संस्था उभारली आह.आदिवासी विभागाचा विकास व वृक्ष संवर्धनाचे ध्येय उराशी बाळगून सहयोग संस्थेची टीम काम करत आहे. या टीमने नुकतेच ठाणे शहरातील येऊर येथे आपलं येऊर मिनी माथेरान हा उपक्रम पार पाडला.आपलं येऊर मिनी माथेरान हा ग्रुप प्रांजल सिंगासने यांनी तयार केला आणि त्यातून प्रेरित होऊन ठाणे टीम हा उपक्रम राबवत आहे गेल्या वर्षभरापासून हा उपक्रम ठाण्यातील येऊर या भागात राबविला जात आहे.आदिवासी क्षेत्राचा विकास त्याचबरोबर वृक्ष संवर्धनावरही या संस्थेने भर दिला आहे.
जोगेश्वरीच्या प्रांजल सिंगासने यांनी आपलं येऊर मिनी माथेरान ही मोहीम ठाणे क्षेत्रात विस्तारण्यासाठी सहयोग संस्थेची टीम ठाणे प्रयत्न करत आहे. आणि पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत अनेक सामाजिक संस्थांची मदत या कार्यकर्त्यांना मिळत आहे. आताच्या धावपळीच्या काळात पुरेशा प्रमाणात प्राणवायू न मिळाल्यामुळे पर्यटक खूप पैसा खर्चून लांब पल्ल्याच्या थंड हवेच्या ठिकाणी जाणे पसंत करतात आणि शरीराला प्रवासाचा त्रास करून घेतात परंतु ठाणे येथील येऊर हे ठिकाण मुंबईकरांच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहे परिणामी वेळ व पैसा दाेनीची बचत या ठिकाणी आल्यावर होते. दिनांक 30 मे रोजी सहायक संस्थेने पंडित शाळा पाटोणापाडा येथे कार्यक्रम केला यामध्ये सीडबॉल कार्यशाळा,बीजारोपण कार्यक्रम व आपल्या येऊर मिनी माथेरान हे पथनाट्य सादर केले. या पथनाट्यात अंबरनाथ येथील तेजस अकॅडमीतील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. या पथनाटय़ाची निर्मिती प्रांजल सिंगासन, विठ्ठल वनमाने, प्रवीण जवणे व मदन मोगरे यांच्या अथक परिश्रमातून झाली.
येऊर येथे रोजगार निर्मिती शिक्षण देण्यासाठी संजय महाजन व महानंदा तुपे यांचा पुढाकार आहे हे दोघे वेळोवेळी येऊर येथे जाऊन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करीत असतात संबंधित कार्यक्रमात आदिवासी मुलींनी तारपा नृत्य सादर केले त्या नृत्यातील कलाकारांना महानंदा तुपे व कांचन कदम यांनी भेटवस्तू दिल्या. सुवर्णपदक विजेता किशोर म्हात्रे यांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन उपस्थितांकडून योगाचे प्रात्यक्षिक करून घेतले व मार्गदर्शन केले. देवरत वनगे यांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभागी होऊन उपस्थितांना फोटोग्राफीविषयी माहिती दिली. सहयोग संस्थेचा पुढील कार्यक्रम येऊर येथील रहिवाशांबरोबर स्वच्छता मोहीम राबवणे व प्लास्टिक मुक्त येऊर करणे हे ध्येय समोर ठेवून ही संस्था वाटचाल करीत आहे.