नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झालं असून गांधीनगरमधून लोकसभा निवडणूक जिंकून प्रथमच लोकसभेत निवडून आलेले भाजपाध्यक्ष व मोदींचे विश्वासू सहकारी अमित शहा यांच्याकडं गृहखात्याचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मागील सरकारमध्ये गृहमंत्री असलेल्या राजनाथ सिंह यांची संरक्षणमंत्रिपदी वर्णी लागली असून निर्मला सीतारामन यांना अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, पीयूष गोयल यांच्याकडील जबाबदाऱ्या ‘जैसे थे’ ठेवण्यात आल्या आहेत.
मोदी मंत्रिमंडळाचे खातेवाटप पुढीलप्रमाणे…
पंतप्रधान – नरेंद्र मोदी
संरक्षणमंत्री – राजनाथ सिंह
गृहमंत्री – अमित शहा
अर्थ व कंपनी व्यवहार – निर्मला सीतारामन
परिवहन – नितीन गडकरी
महिला-बालकल्याण – स्मृती इराणी
आरोग्य, विज्ञान-तंत्रज्ञान – डॉ. हर्षवर्धन
रेल्वे – पीयूष गोयल
मनुष्यबळ विकास – रमेश पोखरियाल निशंक
क्रीडा – किरेन रिजीजू
माहिती व प्रसारण – प्रकाश जावडेकर
सामाजिक न्याय – थावरचंद गेहलोत
कृषिमंत्री – नरेंद्रसिंह तोमर
खते व रसायन – सदानंद गौडा
संसदीय कामकाज व खाण – प्रल्हाद जोशी
अन्न व पुरवठा, ग्राहक संरक्षण – रामविलास पासवान
कायदा – रवीशंकर प्रसाद
आदिवासी विकास – अर्जुन मुंडा
अल्पसंख्याक – मुख्तार अब्बास नक्वी
कौशल्य विकास – महेंद्र नाथ पांडे
अन्न प्रक्रिया उद्योग – हरसिमरत कौर बादल
अवजड उद्योग – अरविंद सावंत