यंदाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात स्वताःला समाविष्ट करू नये, अशी विनंती करणारे पत्र अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले आहे. या पत्रात त्यांनी त्यांच्या आरोग्याचा संदर्भ दिला आहे.
नरेंद्र मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात अरुण जेटली अर्थमंत्री आणि काही काळ संरक्षण मंत्रीपदही त्यांनी सांभाळले होते. गेल्या 8 महिन्यांपासून ते गंभीर आरोग्यविषयक समस्यांशी लढा देत आहेत.
अरुण जेटली हे विद्यार्थी दशेपासूनच भाजपशी जोडले गेले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते सदस्य होते. 1991 साली ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बनले.