भारत सरकारची प्रधान मंत्री उज्ज्वला योजना (PMUY) विस्तारीत करून त्याच्या अंतर्गत 5 किलोग्राम वजनी LPG गॅस सिलिंडर वितरीत करण्याची योजना आहे. 5 किलोग्राम वजनी सिलेंडरची सध्याची किंमत 260 रुपयांच्या आसपास आहे, तर अनुदान म्हणून सुमारे 80 रुपये बँक खात्यात जमा केले जाणार.
2016 सालापासून राबविण्यात येत असलेल्या उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत, प्रत्येक गॅस जोडणीमागे 1,600 रुपयांच्या आर्थिक मदतीने दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांला गॅस जोडणी दिली जाते. LPG जोडणी कुटुंबातल्या महिला सदस्याच्या नावावर दिले जाते. ही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून राबवली जात असलेली प्रथम कल्याणकारी योजना आहे.
आतापर्यंत, योजनेमधून 71.9 दशलक्ष गॅस कनेक्शन दिले गेले आहेत. योजनेच्या अंतर्गत एका वर्षात सरासरी तीन सिलेंडर वितरीत केले जातात आणि राष्ट्रीय सरासरी सात सिलेंडर आहेत.