सुपरकंडक्टर (अत्याधिक गुणवत्ता असलेले विद्युतवाहक) ही पदार्थाची/धातूची अवस्था प्राप्त केली गेली आहे, असा दावा शिकागो विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या आंतरराष्ट्रीय चमूने केला आहे.
‘सुपरकंडक्टिव्हिटी’ (परिपूर्णतेसह विद्युत वहनाची क्षमता) या वैशिष्ट्याचा शोध घेण्यासाठी आतापर्यंतच्या विक्रमी अश्या अति-उच्च तापमानामध्ये हा प्रयोग करण्यात आला आहे. प्रयोगादरम्यान संशोधकांनी किमान उणे 23 अंश सेल्सियस (उणे 9 अंश फॅरेनहाइट, 250 केल्विन) एवढे तापमान कमी केले. सुरुवातीला उणे 240 अंश सेल्सियस आणि त्यानंतर उणे 73 डिग्री सेल्सियस एवढ्या तापमानासाठी हा प्रयोग केला गेला होता.
सुपरकंडक्टिव्हिटी अवस्था अत्यंत उच्च दाबाखाली (150 ते 170 गिगापास्कल) प्राप्त केली जाऊ शकते. या अवस्थेत पदार्थ विद्युत करंट याला शून्य रेझिस्टंस (विद्युत गुणधर्म) दर्शवतो आणि विद्युत क्षेत्रात चुंबकीय क्षेत्र प्रवेश करू शकत नाही. हा शोध खोलीच्या तापमानामध्ये सुपरकंडक्टिव्हिटी अवस्था तयार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरले आहे.