गेल्या 10 वर्षांत देशभरातल्या विद्यापीठांतर्फे डॉक्टरेट पदवी प्राप्त केलेल्या व्यक्तींच्या PhD संशोधनाची गुणवत्ता तपासण्याचा विचार विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) करीत आहे. PhD संपादन करणाऱ्यांची सर्वाधिक संख्या भारतात आहे. पण, त्यांच्या संशोधनाची गुणवत्ता हा चिंतेचा विषय असून, केवळ पदोन्नती मिळवण्यासाठी प्राध्यापकांकडून संशोधन आणि शोधनिबंध सादर केले जातात, असे केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाला आढळून आले आहे. देशात 864 विद्यापीठे आहेत.
आयोगाने सहा महिन्यांच्या कालावधीत हा अभ्यास आयोजित करण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित केले आहेत. या अभ्यासाच्या व्याप्तीमध्ये विविध केंद्रीय विद्यापीठे, राज्य विद्यापीठे, राज्य खासगी विद्यापीठे यांच्याद्वारे विविध विषयांमध्ये केल्या गेलेल्या PhD शोधाभ्यासांना समाविष्ट केले जाणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ही भारतातली विद्यापीठीय शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी देशातली सर्वोच्च संस्था आहे. या आयोगाची स्थापना दि. 28 डिसेंबर 1953 रोजी करण्यात आली. 1956 सालाच्या कायद्यानुसार ‘UGC’ला वैधानिक दर्जा प्रदान