मानखुर्द | ‘जिंदगी चुनो,तंबाखू नही’या थीम अंतर्गत जागतिक तंबाखू विरोधी दिना निमित्त(३१ मे २०१९ रोजी) युवासेना युवा विभाग अधिकारी श्री.गणेश वाव्हळ यांच्या पुढाकाराने बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.प्रथम पारितोषिक ऐ. व्ही.सी. लाल डोंगर आणि द्वितीय पारितोषिक रॉयल साई सिद्धी चेंबूर या संघाने मिळविले.
याप्रसंगी मुंबईतील असंख्य तरुण उपस्थित होते. त्याचबरोबर उपविभाग प्रमुख श्री.तात्या सारंग,नगरसेविका समीक्षा सक्रे,शयनाज शेख,किशोर मोरे,सोनू बनगेरा,प्रकाश वाघमारे इत्यादी उपस्थित होते.