म्युनिक (जर्मनी) येथे सुरु असलेल्या 2019 ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिला गटात 10 मीटर एयर पिस्तूल प्रकारात चौथे स्थान प्राप्त करीत भारताची युवा नेमबाज मनू भाकर (201 गुणासह) हिने टोकियो ऑलंम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे.
महिला गटात 10 मीटर एयर पिस्तूल प्रकारात ऑलंम्पिक कोटा मिळवणारी ती पहिली भारतीय नेमबाज ठरली आहे. 2020 साली टोकियोमध्ये होणार्या ऑलंम्पिकसाठी आतापर्यंत भारताचे सात नेमबाज पात्र ठरले आहेत.