राजस्थान राज्य सरकारने राज्यात ई-सिगारेटचे उत्पादन, वितरण, जाहिराती आणि विक्री अश्या कार्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक तंबाखू बंदी दिनाच्या (31 मे) पार्श्वभूमीवर तरुणांमध्ये वाढत चाललेल्या व्यसनास आळा घालण्याच्या दिशेनी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार. तसेच ई-सिगारेटच्या वाढत्या वापरावर एक विस्तृत संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे.
राजस्थान उत्तर भारतातले एक राज्य आहे. क्षेत्रफळानुसार हा भारतातला सर्वात मोठा राज्य आहे. येथे थार वाळवंट आहे. राज्याच्या उत्तरेकडे पंजाब, ईशान्येकडे हरियाणा आणि उत्तरप्रदेश, नैऋत्येस मध्यप्रदेश आणि वायव्येस गुजरात आहे. 1949 साली राज्याची स्थापना झाली. जयपूर ही राज्याची राजधानी आहे.