भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये येणारी मंदी आणि परिणामी वाढत्या बेरोजगारीचा सामना करण्याच्या उद्देशाने आर्थिक विकास, गुंतवणूक आणि रोजगार यांच्यात वाढ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 जून रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली दोन मंत्रिमंडळ समित्या नेमल्या आहेत.
आर्थिक विकास आणि गुंतवणूक यासंदर्भात पाच सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे, ज्यात गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारमन, भुपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री आणि MSME मंत्री नितीन गडकरी आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांचा समावेश आहे.
रोजगार आणि कौशल्य विकास यासंदर्भात दहा सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे, ज्यात शाह, सीतारमन, गोयल यांच्यासह कृषी मंत्री, ग्रामीण विकास मंत्री, मनुष्यबळ विकास मंत्री, पेट्रोलियम मंत्री, कौशल्य व उद्योजकता मंत्री तसेच कामगार राज्य मंत्री संतोष कुमार गंगवार आणि गृहनिर्माण व शहरी कल्याण राज्य मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा समावेश आहे.