भारताच्या जीडीपी वाढीच्या दरात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा घसरण झाली आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात 7.2 टक्क्यांवर असणारा जीडीपी दर 2018 -2019 या आर्थिक वर्षात 6.8 टक्क्यांवर आला आहे. शेती आणि निर्मिती क्षेत्रातील खराब प्रदर्शनाचा जीडीपाला फटका बसला असल्याचे दिसून येते. 2018-19 च्या जानेवारी-मार्चच्या पहिल्या तिमाहीत तर जीडीपी दर 6% पर्यंत घसरला होता. जो की मागिल वर्षात याच तिमाहीत 8.1 टक्क्यांवर होता. या वर्षात वाढीचा दर 5.8 टक्क्यांपर्यंत आला असल्याचे केंद्राने दिलेल्या आकडेवारीत दिसून आल्याचे सांगण्यात आले आहे.
या वर्षात मार्चच्या तिमाहीतील वाढीचा दर हा 2014-15 पासून ते आतापर्यंतचा सर्वात कमी दर होता. या अगोदर 2013 -14 मधला 6.4 टक्के हा सर्वात निच्चांकी दर होता. मार्चच्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी ही भारताला चीनच्या जीडीपी वाढीच्या दरा मागे टाकत आहे. जे की गेल्या सात तिमाहीत पहिल्यांदाच घडले आहे. चीनने मार्च तिमाहीतील जीडीपी वाढीचा दर 6.4 टक्के नोंदवला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, आठ प्रमुख क्षेत्रांची वाढ गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये 4.7 टक्क्यांवरून यावर्षी याच महिन्यात 2.6 टक्क्यांवर आली आहे.