भारत सरकारने एअर इंडिया या सरकारी विमानसेवा कंपनीमधील त्याचा संपूर्ण हिस्सा विक्री करण्याची योजना आखत आहे. एअर इंडिया सध्या कर्जात बुडाली असल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी एअर इंडियाला 29,464 कोटी रुपयांच्या कर्जासह 33 हजार कोटी रुपयांमध्ये विकत घेण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने दिला होता. परंतु, त्यात अपयश आल्यामुळे एअर इंडियाचे 100% समभाग विकण्याचा विचार केंद्राकडून सुरू झाला.
एअर इंडिया ही भारतीय ध्वजाखाली वाहतूक करणारी सरकारी विमानसेवा कंपनी आहे आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. त्याची मालकी सरकारी मालकीच्या एअर इंडिया लिमिटेड या उपक्रमाकडे आहे. ही 94 स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय गंतव्यांकडे आपली सेवा पुरविते.