स्वयंचलित यंत्रणेमुळे (ऑटोमेशन) 2030 सालापर्यंत भारतातल्या जवळपास 12 दशलक्ष महिलांचा रोजगार हिरावला जाण्याचा धोका आहे, तर भारतातला पुरुष वर्ग त्याच काळात जवळपास 44 दशलक्ष नोकर्या गमावू शकतात, असे मॅककिन्से ग्लोबल इन्स्टिट्यूटच्या नवीन अभ्यासामधून स्पष्ट झाले आहे.
स्वयंचलित यंत्रणेच्या जगात रोजगाराविषयी महिलांचे भवितव्य काय असेल याबाबतचा हा अभ्यास होता, जो 10 देशांमध्ये केला गेला आहे.
कृषी, वनीकरण, मासेमारी, वाहतूक आणि गोदाम अश्या क्षेत्रामधील स्वयंचलित यंत्रणेमुळे रोजगारात कमतरता येऊ शकते आणि मुख्य म्हणजे या क्षेत्रांमध्ये भारतात अधिकाधिक महिला गुंतलेल्या आहेत.