ज्येष्ठ अभिनेते, नाटककार, दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कर्नाड यांचे सोमवारी बंगळुरूत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. जागतिक स्तरावरील इंग्रजी साहित्य आणि कला यामधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना १९९९ मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचबरोबर त्यांना भारत सरकारने पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने गौरविले होते.
गिरीश कर्नाड गेल्या काही दिवसांपासून प्रदीर्घ आजाराशी लढत होते. सोमवारी सकाळी बंगळूरच्या रुण्गालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा कन्नड साहित्यात मोठा वाटा आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले होते आणि अनेक चित्रपटात अविस्मरणीय भूमिका साकारली आहेत. ‘कानुरू हेगाडीथी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, तर ‘इक्बाल’ आणि लाइफ गोज ऑन’ ‘एक था टायगर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. कर्नाड चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.