कर्नाटक राज्य सरकारने राज्यात महिलांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा यासाठी नव्या प्रकाराचे ‘पिंक सारथी’ वाहन सादर केले. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी वाहनाचे उद्घाटन केले. शहरात धावणार्या बस-गाड्यांमधील महिला प्रवाशांच्या तक्रारींना हाताळण्यासाठी या वाहनांचा वापर केला जाणार आहे.
‘पिंक सारथी’ वाहनांची खरेदी बेंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BMTC) कडून करण्यात आली. निर्भया योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून 56.07 कोटी रूपयांचा निधी या वाहनांच्या खरेदीसाठी दिला गेला. वाहनात GPS आणि PA सिस्टम बसविण्यात आली आहेत.