जागतिक मैदानी खेळाडूंचे प्रशासकीय मंडळ म्हणून ओळखले जाणारे ‘इंटरनॅशनल एसोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशन्स (IAAF)’ या क्रिडा-संघटनेला परत एकदा “वर्ल्ड अॅथलेटिक्स” अशी ओळख देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्तमानातले नाव 2001 साली स्वीकारले गेले होते. नव्या निर्णयानुसार ऑक्टोबर 2019 मध्ये IAAFचे वर्तमान नाव बदलून “वर्ल्ड अॅथलेटिक्स” असे केले जाणार.
इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशन्स (IAAF) ही अॅथलेटिक्सच्या खेळासाठीची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. IAAFची स्थापना 1912 साली इंटरनॅशनल आर्मेचर अॅथलेटिक्स फेडरेशन या नावाने करण्यात आली. IAAFचे मुख्यालय मोंटे कार्लो (मोनॅको) येथे आहे. या महासंघाचे 215 राष्ट्रीय संघ सदस्य आहेत.