भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) दिलेल्या नवीन निर्देशानुसार, कमर्शिएल बँकांकडून बेसिक सेव्हिंग बँक डिपॉजिट (BSBD) खातेधारकांना ऑटोमेटिक टेलर मशीन (ATM) तसेच इतर मार्गाद्वारे महिन्यामध्ये कमीतकमी चार वेळा पैसे काढण्याची सुविधा दिली जाणार आहे.
तसेच बँका चेकबुक अश्या अतिरिक्त मूल्यवर्धित सेवा पुरविण्यास मुक्त असणार. अतिरिक्त सेवांचा फायदा ग्राहकांसाठी पर्यायी असेल. शिवाय, BSBD खातेधारक इतर बचत बँक ठेव खाते उघडण्यासाठी पात्र नाहीत.
बेसिक सेव्हिंग बँक डिपॉजिट (BSBD) खाता मुख्यत्वेकरून समाजातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये आर्थिक अंतर्भाव वाढवण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आले आहे. यात ठेव जमा करण्याची आणि पैसे काढण्याची सेवा विनामूल्य आहे.