2021 या सालापासून देशातून एकदाच वापरात येणार्या प्लास्टिकला बाद करण्यासाठी त्यावर बंदी घालण्याचा निर्णय कॅनडा देशाच्या सरकारने घेतला आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, स्ट्रॉ आणि प्लेटा यामुळे तयार होणारा कचरा सर्रासपणे महासागरात सोडला जातो. त्याला रोखण्यासाठी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या “जागतिक आव्हान”चा सामना करण्यासाठी आपल्या प्रयत्नांची घोषणा केली.
कॅनडामध्ये वापरल्या जाणारे 10 टक्क्यांहून कमी प्लास्टिक पुनर्प्रक्रीयेतून वापरात आणले जाते आणि उर्वरित कचरा सागरात टाकला जात आहे. अश्या पद्धतीने जगभरामधील महासागर दूषित होत चालले आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम सागरी जीवनावर आणि परिणामी मानवावर होत आहे.
हा उत्तर अमेरिका उपखंडातला एक प्रमुख देश आहे. रशियानंतर कॅनडा जगातला द्वितीय क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. ओटावा हे कॅनडा देशाचे राजधानी शहर आहे. कॅनेडियन डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.