साहित्यासाठी देण्यात येणारा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ हा भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च गौरव. इंडिया हॅबिटेट सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात घोष यांना सन 2018च्या, 54व्या ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी उपस्थित होते. ज्ञानपीठ निवड समितीच्या चेअरपर्सन प्रतिभा राय, भारतीय ज्ञानपीठचे संचालक मधुसूदन आनंद, व्यवस्थापकीय विश्वस्त साहू अखिलेश जैन आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते.
यावेळी भारतीय ज्ञानपीठच्या वतीने अमिताव घोष यांना प्रशस्तीपत्र, शाल, सरस्वतीची प्रतिमा, 11 लाख रुपये देऊन गौरविण्यात आले. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे घोष हे पहिलेच इंग्रजी लेखक आहेत. भारतीय ज्ञानपीठने इंग्रजी भाषेचा समावेश आपल्या पुरस्कार यादीत केला, ही बाब खूपच आनंददायी आहे, अशी भावना अमिताव घोष यांनी यावेळी नोंदवली.अमिताव घोष यांना आजवर पद्मश्री, साहित्य अकादमी, टागोर साहित्य पुरस्कार, आनंद पुरस्कार, आर्थर सी क्लार्क पुरस्कार, क्रॉसवर्ड पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.