‘वायू’ चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीवर धडकण्याचे अंदाज वर्तविले जात होते मात्र हवामान खात्याच्या माहितीनुसार, चक्रीवादळाने दिशा बदलून आता गुजरातच्या दक्षिण समुद्र किनाऱ्याला समांतर अंतराने प्रवास सुरू ठेवला आहे. त्यामुळे ‘वायू’ चक्रीवादळाचा तडाखा थेट गुजरातला बसणार नसला तरीही समुद्र किनाऱ्यावर मात्र परिणाम दिसून येणार आहे.
चक्रीवादळ 16 जून रोजी परतू शकते आणि 17-18 जूनला कच्छमध्ये धडकू शकते. ‘वायू’ चक्रीवादळ हा यावर्षी भारतात धडकणारा दुसरा चक्रीवादळ आहे. तरीही गुजरातच्या किनारपट्टीवर येत्या 48 तासांमध्ये चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.