जगातील हाय स्पीड इंटरनेट असलेल्या 10 देशांची यादी जाहीर. जगात 4G इंटरनेटचा सध्या वापर केला जात आहे. यामध्ये भारताचा समावेश झाला आहे. तर या यादीमध्ये कोणता देश कितव्या स्थानी आहे, हे जाणून घेऊया…
1) दक्षिण कोरिया : हाय स्पीड इंटरनेट स्पीड देण्यामध्ये दक्षिण कोरिया सर्वात अग्रस्थानी आहे. 97.5 टक्के 4G इंटरनेट उपलब्ध आहे. युजर्सना 52.4Mbps डाऊनलोड स्पीड मिळतो.
2) नॉर्वे : इंटरनेट स्पीडमध्ये साऊथ कोरियानंतर नॉर्वेचा दुसरा नंबर लागतो. या देशात 48.2Mbps डाऊनलोड इंटरनेट स्पीड आहे.
3) जपान : जपानमध्ये 96.3 टक्के 4G नेटवर्क आहे. तसेच युजर्स 33Mbps डाऊनलोड स्पीड मिळतो.
4) हाँग काँग : हाँग काँगमध्ये डाऊनलोड इंटरनेट स्पीड 16.7Mbps आहे. 4G इंटरनेट 94.1 टक्के आहे.
5) अमेरिका : अमेरिकेमध्ये 21.3Mbps डाऊनलोड इंटरनेट स्पीड आहे. तर 4G उपलब्धता 93 टक्के आहे.
6) नेदरलँड : नेदरलँडमध्ये 4G इंटरनेटची उपलब्धता 92.8 टक्के आहे. युजर्स येथे 42.4Mbps डाऊनलोड इंटरनेट स्पीड मिळतो.
7) तैवान : तैवानमध्ये डाऊनलोड इंटरनेट स्पीड 26.6Mbps आहे. 4G नेटवर्क 92.8 टक्के आहे.
8) हंगेरी : हंगेरीमध्ये 4G नेटवर्क 91.4 टक्के आहे. तर डाऊनलोड इंटरनेट स्पीड 32.7Mbps आहे.
9) स्वीडन: स्वीडनमध्ये 30.8Mbps डाऊनलोड इंटरनेट स्पीड आहे. तर 4G नेटवर्क 91.1 टक्के आहे.
10) भारत : भारतामध्ये डाऊनलोड इंटरनेट स्पीड 6.8Mbps आहे. तसेच 4G नेटवर्क 90.9 टक्के आहे.