देशात २०२१ साली होणाऱ्या जनगणना मोहिमेस सुरुवात भारताचे महानिबंधक तथा जनगणना आयुक्तांच्या कार्यालयामार्फत देशात जनगणना केली जाते. २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत माहितीचे संकलन प्रथमच ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या जनगणना संचालक रश्मी झगडे म्हणाल्या की, सन 2021 च्या जनगणनेसाठी चाचणीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. या चाचणी ऑगस्ट ते सप्टेंबर 2019 दरम्यान देशातील निवडक जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी भागांमध्ये होणार आहे.
ऑनलाईन चाचणी यशस्वी झाल्यास शासकीय धोरण ठरविण्यासाठी त्याचा उपयोग होईल. संशोधकांनाही आवश्यक तेव्हा जनगणनेची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच प्रश्नावली, सूचना पुस्तिका, माहिती संकलनाची पद्धत सुनिश्चित करणे शक्य होणार आहे.