कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत जगात सर्वात शक्तिशाली असलेला सुपर कॉम्प्युटर ‘डीजीएक्स-2’ आता भारतातही आला आहे. हा कॉम्प्युटर आयआयटी जोधपूरमध्ये बसवण्यात आला आहे. यामुळे देशातील कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित प्रशिक्षणाला गती मिळू शकेल.
जोधपूरमध्ये कॉम्प्युटर सायन्स विभागाचे अध्यक्ष डॉ. गौरव हरित यांनी सांगितले, हा जगातील सर्वात वेगवान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅप्लिकेशन्ससाठी सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर आहे.
तो एका विशेष प्रयोगशाळेत बसवण्यात आला आहे. या सुपर कॉम्प्युटरची किंमत सुमारे 2.50 कोटी रुपये आहे. त्यामध्ये 16 विशेष जीपीयू कार्ड बसवले असून प्रत्येकाची क्षमता 32 जीबीची आहे. तिची रॅम 512 जीबी आहे. सामान्य कॉम्प्युटरची क्षमता केवळ 150 ते 200 वॅट असते तर या सुपर कॉम्प्युटरची क्षमता 10 किलोवॅट आहे.