कोल्हापूरची शान असलेल्या कोल्हापुरी चपलांना ‘जीआय’ अर्थात ‘भौगोलिक मानांकन’ प्राप्त झाले आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. परिणामी, जगभरात कोल्हापुरी चपलाची शान वाढली आहे.
आतापर्यंत देशभरातील ३२६ उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून, महाराष्टतील ३२ उत्पादनांचा यात समावेश आहे. यांपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापुरी गूळ आणि कोल्हापुरी चप्पल ही दोन उत्पादने आहेत.