जगभरातील सर्वोत्तम 200 शिक्षण संस्थांची नावे ‘क्यू एस रँकिंग’ या जागतिक मानांकन संस्थेने केली प्रकाशित. देशातील शिक्षणसंस्थांमध्ये आयआयटी मुंबई सर्वोत्तम, विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी आयआयटी मुंबईने क्रमवारीत हे स्थान पटकाविले.
क्रमवारीत आयआयटी मुंबई 152व्या स्थानी, आयआयटी दिल्ली 182व्या स्थानी तर बेंगळूरुची ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ 184व्या स्थानी आहे. 23 भारतीय संस्थांपैकी 4 संस्थांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत क्रमवारीत वरचे स्थान मिळवले असून 7 संस्थांना मात्र या यादीत टिकाव धरता आलेला नाही
मॅसॅच्युसेट्स् विद्यापीठ सर्वोच्च स्थानी :
या यादीत अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स् विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे याच विद्यापीठातील ‘मॅसॅच्युसेट्स् इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेने तब्बल 8 वर्षे सर्वोत्तम शिक्षण संस्थेचे स्थान कायम राखले आहे.