विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत भारतीय जनाता पक्षाची पूरवनियोजन बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री असावा ही सर्वांची इच्छा असल्याचे मंत्री गिरीश महाजन माध्यमांशी बोलताना म्हणाले. लोकसभेचा निकाल पाहता राज्यात भाजप मोठा भाऊ आहे.
त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची आणि पदाधिका-यांची भावना आहे की भाजपचा मुख्यमंत्री व्हावा. शिवसेनेच्या जागा निवडून येण्यासाठी आम्हीच प्रयत्न केले. जिथे शिवसेना कमकुवत होती त्याजागी आम्ही मदत केली. मुख्यमंत्री हा विषय पूर्ण वेगळा आहे याबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील असे गिरीश महाजन यावेळी म्हणाले .