बॉलिवूडचे प्रसिद्ध व्हिलन दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांना गुगलने खास डुडलच्या माध्यमातून मानवंदना दिली. अमरीश पुरी यांची आज ८६ वी जयंती आहे. याचे औचित्य साधत गुगलने त्यांचे डुडल तयार केले आहे. ह्या डुडलवर सर्व भारतीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. मिस्टर इंडिया चित्रपटातील “मोगॅम्बो खुश हुवा” हा संवाद ऐकताच अमरीश पुरी यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
अमरीश पुरी यांचा जन्म २२ जून १९३२ रोजी पाकिस्तानच्या लाहोर येथे झाला. सुरुवातीला त्यांनी हिंदी चित्रपटात छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. १९८० साली प्रदर्शित झालेल्या हिंदी सिनेमा ‘हम पाच’ मधून त्यांची सिनेसृष्टीत चर्चा झाली. यानंतर त्यांच्या मोठ्या कारकीर्दीला सुरुवात झाली. पहाडी आवाजाच्या जोरावर अमरीश पुरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांनी जवळपास ४०० पेक्षा चित्रपटात आपल्या अभिनयाची ठसा उमटवली. ‘नायक’ चित्रपटात त्यांनी केलेल्या मुख्यमंत्रीची भूमिका खूप गाजली होती. अश्या या जिगरबाज नटाचा कर्करोगाच्या आजाराने १२ जानेवारी २००५ साली निधन झाले.