भारताने इस्रायलशी 300 स्पाईस बॉम्ब खरेदी करण्याचा करार केला आहे. भारतीय हवाई दल इस्रायल सरकारकडून 100 पेक्षा जास्त स्पाईस बॉम्ब खरेदी करणार आहे. या स्पाईस बॉम्बचा वापर भारताने बालाकोट हल्ल्यात केला होता. स्पाईस बॉम्ब हे अचूक आणि भेदक क्षमतेसाठी ओळखले जातात. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या बालाकोट हल्ल्यात याच स्पाईस बॉम्बचा वापर करण्यात आला होता.
भारताने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी याच स्पाईस बॉम्बचा वापर केला होता. इस्रायलशी झालेल्या करारानुसार, येत्या तीन महिन्यांत भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात हे आधुनिक बॉम्ब दाखल होणार आहेत. स्पाईस बॉम्बची काही वैशिष्ट्ये – स्पाईस बॉम्बची निर्मिती राफेल कंपनीने केली आहे, अचूक लक्ष्यभेद, 60 किलोमीटरपर्यंत अचूक मारा करण्याची क्षमता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे लक्ष्यभेद करण