मंगळ ग्रहावर एका प्रयोगादरम्यान वातावरणामध्ये रेणूचे प्रमाण मोजत असताना NASAने पाठवविलेल्या ‘क्यूरिओसिटी’ नावाच्या रोव्हरला कल्पनेच्या विपरीत तेथे मोठ्या प्रमाणात मिथेन वायू उपलब्ध असल्याचे आढळून आले आहे.
संशोधकांना मिळालेल्या माहितीमधून असे निष्कर्ष निघाले की तेथे 21 पार्ट्स पर बिलियन या प्रमाणात मिथेन वायूची पातळी आहे, जे पूर्वी कधीही पाहिले गेले नव्हते आणि पूर्वी आढळलेल्या प्रमाणापेक्षा सुमारे तीन पटीने ते जास्त आहे. योग्य उपकरणे उपलब्ध नसल्याने ही उत्पत्ती जैविक आहे की भूगर्भीय हे अजूनही स्पष्ट झाले नाही.
अनेक असे सुचवितात की मिथेनची उच्च पातळी असणे म्हणजे मंगळावर जीवन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पृथ्वीवरील मिथेन हा एक महत्त्वाचा रेणू आहे आणि अनेक जिवंत प्राणी आणि सूक्ष्मजीव सुद्धा हा शरीराच्या बाहेर टाकतात.
मंगळ हा सूर्यमालेतला चौथा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह (किंवा लाल ग्रह) असेसुद्धा म्हटले जाते. हा तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साइडमुळे मिळाला आहे. सूर्यमालेतला सर्वांत उंच पर्वत ऑलिम्पस मॉन्स तसेच सर्वांत मोठी दरी व्हॅलेस मरिनेरिस मंगळावर आहे.