विश्वचषकात संधी न मिळाल्याने नाराज अंबाती रायडूने घेतला निवृत्तीचा निर्णय का घेतला निर्णय विश्वचषकांमध्ये रायडू राखीव खेळाडूंमध्ये होता. विजय शंकर आणि शिखर धवन दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतरही रायडूची निवड झाली नाही. यामुळे निराश झालेल्या रायडूने निवृत्तीची घोषणा केली.
रायुडूने 50 एकदिवसीय सामन्यात 1694 धावा केल्या आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळी नाबाद 124 धावांची आहे. रायडूने 3 शतके आणि 10 अर्धशतके झळकावली आहे. 2004 मध्ये रायुडूने अंडर-19 च्या भारतीय संघाचे कर्णधारपद भूषावले आहे.
रायडूला का डावलले अनेकदा मधल्या फळीसाठी रायुडूला संधी दिली परंतु त्याला सातत्य राखता आले नाही. त्यामुळेच वर्ल्डकप साठीच्या संघात त्याची निवड झाली नाही.
या देशाकडून खेळण्यासाठी ऑफर आमच्या संघाकडून खेळ अशी ऑफर आइसलँड संघाने रायडूला दिली आहे. आइसलँड क्रिकेटनं ट्विटद्वारे ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी रायुडू आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे.