वर्षानुवर्षे जेव्हा निर्बलांवर अत्याचार झाले तेव्हा त्याच्यात कुणी एक हिरो झाला किंवा तो बाहेरून आला आणि मग ती व्यवस्था सुधारली मात्र तो पर्यत समाज कधीच एकवटला नाही तो फक्त वाट बघत राहिला आणि सहन करीत राहिला म्हणून आता असा समाज नकोय जो हिरोची वाट बघेल आता समाज हवाय जो स्वता काम करेल . हा ठसा उमटवत बहुचर्चित , प्रतिक्षित आणि वादग्रस्त चित्रपट आर्टिकल 15 रिलीज झालेला आहे . ट्रेलर मध्ये दाखविल्याप्रमाणे समाज व्यवस्थेवर चित्रपट भाष्य करतो . मात्र चित्रपट फक्तच समाज व्यवस्था नाही तर भाषा , देश , वोटिंग आणि धर्म व्यवस्थेवर सुद्धा तेवढा प्रकाश टाकतो त्यामुळे हा चित्रपट प्रत्येकाने बघावा असा आहे .
कलाकार आणि अभिनय
चित्रपटात आयुष्यमान खुराना
यांनी लीड रोल केला आहे तर त्यांना साथ दिली आहे ती , कुमुद मिश्रा , मनोज पाहावा , सायनी गुप्ता , इशा तलवार , मोह्हमद
झीशान , आशिष वर्मा व नसार यांनी. अभिनयाबाबतीत जर बोलल्या गेलं तर प्रत्येक पात्रावर खास काम केल्या गेलं आहे . आयुष्यमान ला देशाची वर्णव्यवस्था माहित नाही या रूपाने त्याला दाखविल्या गेलं आहे . ज्याचा तो वारंवार शोध घेत असतो . बाकीच्या कलाकारांनी त्यांच्या पात्रांना पूर्ण न्याय दिला आहे . मात्र यात सायनी गुप्ता हे नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल . तिचा अभिनय ह्या साऱ्यावर भारी पडलेला आहे . झीशान च पात्र एका दलित ऍक्टिव्हिस्ट च आहे , आणि त्याच्या साठी जो कॉस्ट्यूम आणि मेकअप आहे तो पूर्णपणे चंद्रशेखर आझादांची आठवण करून देतो . त्यामुळे अभिण्याबाबतीत चित्रपट हा पुरेपूर आहे .
कथा आणि लेखन
गौरव सोळंकी आणि अनुभव सिन्हा यांनी कथा लिहिली आहे . अनुभव ने स्वताच पटकथा लिहिली असून ती योग्य आहे मात्र तेवढी प्रभावी झाली नाही असे पाहताना वाटेल त्याला कारण असे की त्याने भारतीय सिनेमांची चौकटच ओलांडली आहे . आजवर पाहिलेल्या ड्रामा कॅटेगरी मधील चित्रपटांमध्ये आणि ह्या चित्रपटात फरक आहे . त्यामुळे कदाचित पाहणाऱ्यांना ती मंद वाटेल . कथेच लेखन आणि संवाद जे मांडल्या गेले आहेत ते सुद्धा अप्रतिम आहेत . झीशान ला जे संवाद दिल्या गेले ते अप्रतिम वाटतात . समाज व्यवस्थेला पहात सुरुवात ते शेवट कथेत बदल आहे तो जसा सत्यात आहे तसाच मांडल्या गेलाय . त्यामुळे हे रंजक जरी नाही वाटत असेल तरी माणसाच्या मन मस्तिष्कला लाखो प्रश्नाच्या किनाऱ्यावर नेऊन उभी करू शकते . एवढे जबरदस्त संवाद आणि कथेत येणारे काही बदल आहेत . त्यामुळे कथा देखील उत्तम वाटते .
दिग्दर्शन आणि दिग्दशर्क
अनुभव सिन्हा यांची हि फिल्म असून यात आपणास पूर्णपणे मुल्क ची आठवण येईल . तीच संकल्पना आणि येणाऱ्या फ्रेम , पात्रांवर केल्या गेलेलं विशेष काम , चित्रपटातील सहजता मात्र त्यातील भयावह सत्य ह्या बाबी त्यांना खूप उत्तम पणे मांडता येतात जे कि त्यांनी पूर्ण केलं आहे . चित्रपटात एक- दोन सीन इतके उत्तम वाटत आहेत जसे कि एक गटार आणि शेवटी झीशान हा व्यवस्थेचा अडथळा बनतोय म्हणून त्याला संपविणे हे सीन्स एवढे प्रभावी बनले आहेत की जिवंत माणसांना नक्कीच रडवतील . काही ठिकाणी चित्रपट ओढल्यासारखा वाटतो . ते सोडून चित्रपटाची मांडणी हि उत्तम झाली आहे .
चित्रपट आणि त्याचा मूळगाभा
आपण साऱ्यांनीच लहानपणापासून आपल्या पुस्तकांच्या पहिल्या पानावर प्रस्तावना वाचली असेल . त्यात ” समानता ” या मूल्याचा उल्लेख केला गेला आहे . चित्रपटाच नावच आर्टिकल 15 असल्याने आपल्याला माहित असावं कि कलम 15 नुसार जन्मस्थान , लिंग , जात , धर्म , भाषा , रंग या अधारावर राज्य विभेद करू शकत नाही . 1950 साली आपण हे स्वीकारलं मात्र काय आज हे सत्य आहे काय ? याच आधारावर चित्रपट भाष्य करतो . आज दलितांना कुत्र्याच्या हि खालचा दर्जा दिला आहे हे चित्रपट एका सिन वरून दिसत कि मनोज पहावा हे जातीने ब्राम्हण असून त्यांना दलितांचा अतिशय राग असतो , मात्र त्याच वेळेस ते जिथे कुठे जातील तिथे कुत्र्याला बिस्कीट देतात आणि त्यांना इजा जरी झाली तर त्यांना त्रास होतो म्हणजे कुत्र्यांना साधा त्रास जरी असला तरी ते दुःखी असतात मात्र इकडे दलितांवर अत्याचार झाला तरीही त्यांना काहीच वाटत नाही . हा चित्रपटात एक सुपर पंच वाटतो . इशा तलावर आणि आयुष्यमान यांच्यात एका संवादात एक डॉयलॉग येतो की , हिरो नकोय फक्त हिरोची वाट न पाहणारा समाज हवा . ह्या संवादात खूप काही लपलेलं आहे कदाचित आजच्या दलित आंदोलनात ते मागे राहण्याचं कारण देखील .
झीशान चे डॉयलॉग तर आजच्या दलित आंदोलनासाठी शिकवन ठरतात . त्याच्या काही डॉयलॉग वरून तो रोहित वेमुला वाटत असतो तर त्याच्या मेकअप वरून आझाद . तो शेवटी म्हणतो कि मी जातोय मला काही झालं तर तुम्ही येणाऱ्या रागाला हत्यार बनवा मात्र हा हत्याराशिवाय दुसरं कोणतीच हत्यारे हातात घेऊ नका . कारण हि हत्यारं आपल्यालाच हिंसक बनवितात आणि आपण जेवढे हिंसक बनू तेवढा आपलाच घाटा होईल . ह्या संवादात त्याने जणू आजच्या दलित आंदोलनाला एक शिकवण दिली आहे की जागा आणि काम करा मात्र ती पद्धत आता बदलवुया . नक्षलवाद उगाच जन्माला नाही आला याची प्रचिती देखील इथे होऊ लागते . असे कित्येक सीन्स समोर येतात जे आपणास आपली आजची लायकी दाखवत आपल्यला आपल्या अधिकारांची जाणीव करून देतात . शेवटी चित्रपट बघावा कि बघू नये हा प्रश्न जर निर्माण होत असेल तर तो प्रत्येकासाठी आहे त्यामुळे आपण सहपरिवार या चित्रपटाला जाऊ शकतो .
– प्रशांत राठोड
(लेखक मराठी आणि हिंदी चित्रपटाचे समीक्षक आहेत)